किल्ले कमळगड



किल्ले कमळगड

 

 

जवळील गाव / शहर

वाई 

कसे जावे ?

(अंतर)

  1. सातारा – वाई (36 KM.)
  2. कराड – सातारा – वाई (86 KM.)
  3. कोल्हापूर – कराड – सातारा – वाई (156 KM.)
  4. पुणे – वाई (87 KM.) वाईतून दोन रस्ते आहेत.
  • वाई – वासोळे – तुपेवाडी – कमळगड (30KM.)
  • वाई – कोंढवली कमळगड (30KM.)

चढ़ाईची श्रेणी

सोपी

भौगोलिक माहिती

उंची – समुद्रसपाटीपासून 1375 मी.

क्षेत्रफळ – 2 हेक्टर

काय पहावे

  • दुर्दैवाने गडाची तटबंदी व दरवाजे पूर्णपणे पडलेले आहे.
  • गडावर कोणतेही अवशेष सध्या गडावर शिल्लक नाहीत.
  • या गडाचे एकमेव वैशिष्ट म्हणजे तलवारीच्या आकाराची गेरुची विहीर.
  • याला कावेची विहीर असेही म्हणतात.
  • गडावरुन आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते.

इतिहास

  • गडाचा इतिहास फारसा ज्ञात नाही.
  • भेळंजा व कात्ताळ गड ही या गडाची इतर नावे आहेत.
  • जावळी विजयानंतर गड शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला असावा.
  • 1806 च्या सुमारास हा किल्ला ताई तेलीण यांच्या ताब्यात होता. बहुधा याच काळात येथे अंकुशी नावाची नाणी पाडली जात होती.
  • एप्रिल 1818 हा गड इंग्रजांच्यावतीने मेजर थॅचेर याने जिंकून घेतला.  
  • पुढील काळात युद्धकैदयांना बंदिवासात ठेवण्यासाठी या गडाचा वापर केला जात होता.

जवळपास

गोरखनाथाचे मंदीर, धोम धरण, महादेव व नृसिंह मंदीर - धोम, मेणवली येथील घाट व नाना फडणवीस यांचा वाडा,  वाई.

Google Map

https://goo.gl/maps/KKCQmKUU3PSVEMoh8

 

By Ccmarathe at English Wikipedia, CC BY-SA 4.0, 

 



 


 

No comments:

Post a Comment