thumbnail

किल्ले केंजळगड


Read More

किल्ले केंजळगड


 

 

 

जवळील गाव / शहर

वाई, भोर

कसे जावे ?

(अंतर)

सातारा – वाई – खावली – पाकेरेवस्ती – केंजळगड (64 KM.)

कराड – सातारा – वाई – खावली – पाकेरेवस्ती –  केंजळगड (115 KM.)

कोल्हापूर – कराड – सातारा – वाई – खावली – पाकेरेवस्ती –  केंजळगड (185 KM.)

पुणे – कापूरहोळ – भोर – ओहोळी – पाकेरेवस्ती –  केंजळगड (80 KM.) 

चढ़ाईची श्रेणी

मध्यम

भौगोलिक माहिती

उंची – समुद्रसपाटीपासून 1301 मी.

लांबी : 228.6 मी. रुंदी : 91.44 मी.

महादेव डोंगररांगेतील मांढरदेव डोंगराच्या एका शाखेवर हा किल्ला आहे.

काय पहावे

खडकात कोरलेल्या रुंद अशा 54 पाय-या.

दरवाजाच्या जोत्यांचे व पहारेक-यांच्या देवड्यांचे अवशेष.

अर्धवट कोरलेले लेणे,

 पाण्याचे तळे, चुन्याचा घाणा, गडदेवता केंजळाई देवीचे भग्न मंदीर.

गडावरुन आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते.

इतिहास

घेरा खेळंजा हे या गडाचे दुसरे व मनमोहनगड (शिवाजी महाराजांनी दिले) हे तीसरे नाव आहे.

पन्हाळ्याचा शिलाहार वंशीय राजा भोज याने हा किल्ला बांधला.

एप्रिल 1674 मध्ये गड शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला.

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शेवटची लढाई याच परिसरात झाली.

26 मार्च 1818 जनरल प्रिझलरने हा गड जिंकून घेतला.

“जर हा किल्ला दृढ़ निश्चयाने लढवला तर तो जिंकने अशक्य आहे.” – एलफिंस्टन. 

जवळपास

रायरेश्वर, मांढरदेव, मेणवली येथील घाट व नाना फडणवीस यांचा वाडा,  वाई, भोर, कमळगड, पांडवगड, किल्ले रोहिडा.

Google Map

https://goo.gl/maps/LdLy1bJtA1wrMrpf9

 


 


 


 


 


 

 


 


 


 


 


 

thumbnail

किल्ले कमळगड


Read More



किल्ले कमळगड

 

 

जवळील गाव / शहर

वाई 

कसे जावे ?

(अंतर)

  1. सातारा – वाई (36 KM.)
  2. कराड – सातारा – वाई (86 KM.)
  3. कोल्हापूर – कराड – सातारा – वाई (156 KM.)
  4. पुणे – वाई (87 KM.) वाईतून दोन रस्ते आहेत.
  • वाई – वासोळे – तुपेवाडी – कमळगड (30KM.)
  • वाई – कोंढवली कमळगड (30KM.)

चढ़ाईची श्रेणी

सोपी

भौगोलिक माहिती

उंची – समुद्रसपाटीपासून 1375 मी.

क्षेत्रफळ – 2 हेक्टर

काय पहावे

  • दुर्दैवाने गडाची तटबंदी व दरवाजे पूर्णपणे पडलेले आहे.
  • गडावर कोणतेही अवशेष सध्या गडावर शिल्लक नाहीत.
  • या गडाचे एकमेव वैशिष्ट म्हणजे तलवारीच्या आकाराची गेरुची विहीर.
  • याला कावेची विहीर असेही म्हणतात.
  • गडावरुन आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते.

इतिहास

  • गडाचा इतिहास फारसा ज्ञात नाही.
  • भेळंजा व कात्ताळ गड ही या गडाची इतर नावे आहेत.
  • जावळी विजयानंतर गड शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला असावा.
  • 1806 च्या सुमारास हा किल्ला ताई तेलीण यांच्या ताब्यात होता. बहुधा याच काळात येथे अंकुशी नावाची नाणी पाडली जात होती.
  • एप्रिल 1818 हा गड इंग्रजांच्यावतीने मेजर थॅचेर याने जिंकून घेतला.  
  • पुढील काळात युद्धकैदयांना बंदिवासात ठेवण्यासाठी या गडाचा वापर केला जात होता.

जवळपास

गोरखनाथाचे मंदीर, धोम धरण, महादेव व नृसिंह मंदीर - धोम, मेणवली येथील घाट व नाना फडणवीस यांचा वाडा,  वाई.

Google Map

https://goo.gl/maps/KKCQmKUU3PSVEMoh8

 

By Ccmarathe at English Wikipedia, CC BY-SA 4.0, 

 



 


 

thumbnail

किल्ले सदाशिवगड


Read More

किल्ले सदाशिवगड  

 

 

जवळील गाव / शहर

ओगलेवाडी, कराड 

कसे जावे ?

(अंतर)

कराड – ओगलेवाडी – सदाशिवगड   (06 KM.)

सातारा – कराड – ओगलेवाडी – सदाशिवगड (60 KM.)

कोल्हापूर  - कराड – ओगलेवाडी – सदाशिवगड (76 KM.)

पुणे - सातारा - कराड – ओगलेवाडी – सदाशिवगड (171 KM.)

चढ़ाईची श्रेणी

सोपी

भौगोलिक माहिती

उंची – समुद्रसपाटीपासून ३०५० फूट.

क्षेत्रफळ – ९ हेक्टर

काय पहावे

दुर्दैवाने गडाची तटबंदी पूर्णपणे पडलेले आहे.

गडाचा दरवाजा उत्तरेकडे होता. तोही पूर्णपणे नष्ट झालेला आहे.

गड म्हणावे असे कोणतेही अवशेष सध्या गडावर शिल्लक नाहीत.

महादेव जुने मंदीर (श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी येथे जत्रा भरते.)

मारुती मंदीर                  चिंच विहीर              महादेव मंदिरासमोरील विहीर

पाण्याची कोरडी तळी.

इतिहास

कराड शहर व चिपळून ते विजापूर या मध्ययुगीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने गडाचे स्थान महत्वाचे होते.

आदिलशाहीच्या ताब्यात असणारा हा गड अफजल खान वधानंतर गड शिवाजी महाराजांच्या ताब्यात.

गडपायथ्याशी भूकंप संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. गडाचा बराचसा भाग या भूकंप संशोधन केंद्राला देण्यात आला आहे.

सध्या सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानतर्फे येथे गडसंवर्धनाचे  कार्य सुरु आहे.

जवळपास

कराड शहर, टेंभू धरण-जलउपसा प्रकल्प,

Google Map

 https://goo.gl/maps/ciWiAVSA3Zt4zp4m6